Monday, November 2, 2015

Childhood

बालपण 

 
काय म्हणू मी काय म्हणू या बालपणाला काय म्हणू
 
 
सुगंध फुले ही सुन्दर कोमल 
फुलवून जाई मन हे कोमल 
भवरयाचे मी गीत म्हणू
की मधुर मधाचा स्वाद म्हणू 
की काय म्हणू मी काय म्हणू या बालपणाला काय म्हणू
 
 
झिरमिर झिरमिर पाऊस धारा 
उड्या मारीती शीतल गारा 
निळे सावळे आकाश म्हणू
की ओल्या मातीचा वास म्हनू 
की काय म्हणू मी काय म्हणू या बालपणाला काय म्हणू
 
 
बालमनाचा गोड गोजीरा 
निर्मल सुन्दर भाव साजिरा 
चंचल पखरानंची काया म्हणू
की मायेची ही छाया म्हनू 
की काय म्हणू मी काय म्हणू या बालपणाला काय म्हणू
 
 
सप्तरंग हे इंद्रधनुचे 
रूसून फूलने रातरानीचे 
कल्पनांचा हा मेळ म्हणू 
की जादूचा हा खेळ म्हणू 
की काय म्हणू मी काय म्हणू या बालपणाला काय म्हणू
 
~ सचिन 

The nest

 घरटं 



काड्या-कचऱ्यानी, पाला-पाचोळयानीं
 
उभराल घरटं ह्या दोन चिमण्यानीं  


वारा वादळानां, उन्-पावसानां 
 
नामविनार घरटं मिळाल चिमण्यानां  


सुख दुःखानी, इच्छा समधनानीं
 
भरलेल घरटं सांभाळल चिमण्यानीं 
 
 
जन्मलेल्या पिल्लानां, त्यांच्या सुख सोइनां 
 
जपणार घरटं पावलं  चिमण्यानां
 
 
पिल्लांच्या गडबडीनी , खेळ आवाजानीं 
 
गजबजलेल घरटं सजावलं चिमण्यानीं 



~ सचिन